ही साईट 1024 गुणीले 768 किंवा त्याहून अधिक रिझॉल्युशनमध्ये सर्वोत्तमप्रकारे पाहता येईल

 

२०१३ गणित (इ. ४ थी) च्या प्रश्नपत्रिकेची वैशिष्ट्ये

 

परत पहिल्या पानाकडे


 

Share on Facebook

 

वैशिष्ट्यपूर्ण प्रश्न १ :

या ठिकाणी लोकसंख्या दिली आहे, आणि साक्षर लोकांची संख्या दिली आहे. त्यापासून वजाबाकी करुन निरक्षर लोकांची संख्या काढणे आवश्यक आहे. नंतर साक्षरांच्या संख्येतून निरक्षर लोकांची संख्या वजा करायची आहे. या क्रिया समजण्यासाठी गणिताचे वाचन नीट करणे आवश्यक आहे. प्रश्नाचा अर्थ समजून घेण्यासाठी कोणती गणिती क्रिया कशासाठी करायची याच्या संकल्पना स्पष्ट हव्यात तसेच क्रियांचा क्रम देखील समजणे महत्वाचे आहे.


वैशिष्ट्यपूर्ण प्रश्न २ :

या प्रश्नातदेखील तीन गोष्टी माहिती असणे गरजेचे आहे. १० तारखेला मंगळवार असेल तर ३ तारखेला मंगळवार असेल (७ चा फरक) ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट ही की जुलै महिना ३१ दिवसांचा असतो हे माहिती हवे. तिसरी गोष्ट माहिती हवी की ३१ दिवस असलेल्या महिन्यांत १, २, ३ तारखांचे दिवस ५ वेळा येतात. 31 = 7 4 + 3 (चार आठवडे अधिक ३ दिवस).


वैशिष्ट्यपूर्ण प्रश्न ३ :

२ किग्रॅ म्हणजे २००० ग्रॅम हे माहिती हवे, २००० ग्रॅममागे २० ग्रॅम कमी होत आहेत हे समजायला हवे (तोंडी वजाबाकी केल्यास उत्तम). म्हणजेच १००० ग्रॅममागे (१ किलो) १० ग्रॅम कमी होतील हे काढायला हवे (त्रैराशीक मांडता येणे). १ किलोला १० ग्रॅम तर १० किलोला १०० ग्रॅम (पुन्हा त्रैराशीक) हे काढून मग १०००० - १०० ही वजाबाकी तोंडी करुन उत्तर काढता येईल.


वैशिष्ट्यपूर्ण प्रश्न ४ :

पर्यायांतील चारही क्रिया करुन पहायला हव्यात. यात बरोबर चिन्हाच्या उजव्या बाजूला देखील गणिती क्रिया करता येतात, बरोबर चिन्हाच्या उजव्या बाजूला उत्तरच असेल असे नाही हे मुलांच्या मनावर ठसवायला हवे.


वैशिष्ट्यपूर्ण प्रश्न ५ :

२५ पैशांचे नाणे २०११ च्या जूनमध्येच व्यवहारातून बाद झाले असले तरी गणिताच्या दृष्टीने त्याचे महत्व अबाधित आहे. थोडेसे खडूस प्रकारचे असे हे गणित आहे, कारण, यात बरेच हिशेब करायचे आहेत. सव्वाअकरा गुणीले पाच करताना अकरा पाचे पंचावन्न अधिक "पाच पाव सव्वा" असे एकुण सव्वाछप्पन रुपये असा तोंडी हिशेब करता यायला हवा. पावकी, निमकी, पाउणकी ज्याला येते त्याच्या दृष्टीने हे गणित हातचा मळ आहे. सव्वापंचवीस गुणीले सात करताना पंचवीस साते १७५ अधिक "सात पाव पावणे दोन" असे एकुण १७६ रुपये ७५ पैसे, अधिक ५१ साते ३५७ (५० साते ३५० अधिक ७) असे एकुण सव्वाछप्पन अधिक पावणे १७७ अधिक ३५७ म्हणजे ५९०.


वैशिष्ट्यपूर्ण प्रश्न ६ :

सकाळी ७.२० ते दुपारी १२.२० असे पाच तास, दुपारी १२.२० ते दुपारी १.२० असा १ तास, दुपारी १.२० ते दुपारी २.१० अशी ५० मिनिटे असे एकुण ६ तास ५० मिनिटे.


वैशिष्ट्यपूर्ण प्रश्न ७ :

  वजन किंमत प्रतिकिलो दर
साखर २ किग्रॅ ७२ ३६
तेल अर्धा किग्रॅ ४२ ८४
खोबरे १ किग्रॅ ८० ८०
मूगडाळ पाव किग्रॅ २२ ८८

२ ने गुणाकार/भागाकार, ४ ने गुणाकार/भागाकार या गोष्टी तोंडी करता यायला हव्यात.


८ ची सामान्यत: ज्ञात असणारी कसोटी (शेवटच्या तीन अंकांनी बनणा-या संख्येला ८ ने भाग जाणे) वापरणे अवघड आहे (लेखी भागाकार करायला लागणे). ही कसोटी कशी वाटते पहा. शतकस्थानची संख्या सम असल्यास दशक-एकक अंकांपासून बनणा-या संख्येस ४ ने भाग जात असेल किंवा शतकस्थानची संख्या विषम असल्यास दशक-एकक अंकांपासून बनणा-या संख्येत ४ मिळवून बनणा-या संख्येस ४ ने भाग जात असेल त्या संख्येला ८ ने भाग जातो.

येथे ७९९२ मध्ये शतक स्थानची संख्या विषम असून ९२ अधिक ४ बरोबर ९६ या संख्येला ४ ने भाग जातो.


- महाएज्युटेकनेट टीम

Share on Facebook


 

संपर्क cyberedutech@gmail.com