स्कॉलरशिप डिव्हिडी पॅकमधील प्रोग्रॅम्स व कंटेंट

Share on Facebook

The program (with all described features) is available separately for Marathi/English/Semi English medium.

वर्ष २००५ पासून स्कॉलरशिप परीक्षेसाठीचा प्रोग्रॅम उपलब्ध आहे. कालानुरुप अनेक बदल, अनेक सुधारणा होत गेल्या. त्या सगळ्याचा उहापोह येथे करण्याचा प्रयत्न केला आहे.

 

सर्वप्रथम या प्रोग्रॅमचे स्वरुप हे संगणकीय चाचण्या अशा मर्यादित स्वरुपाचे होते. घटकवार चाचण्या, मिश्र घटक चाचण्या व संपूर्ण अभ्यासक्रमावर चाचण्या अशा तीन प्रकारच्या चाचण्या उपलब्ध होत्या (आहेत). हा प्रोग्रॅम प्रथमपासूनच मराठी व इंग्रजी या दोन्ही माध्यमांसाठी बनविला गेला होता (आहे). रॅण्डम जनरेशन तंत्राचा वापर हे या प्रोग्रॅमचे वैशिष्ट्य होते. त्यामुळे प्रश्नपेढीतून दर वेळी नवीन प्रश्न येत राहतात व कोणत्याही दोन चाचण्या एक सारख्या असत नाहीत. "तपसाणीसाठी दाखल" केल्यानंतर तात्काळ निकाल समजतो, तसेच कोणते प्रश्न बरोबर व कोणते चुक ते समजते, चुकीच्या उत्तरांऐवजी कोणती बरोबर उत्तरे हवी होती ते ही दाखविले जाते.

हा निकाल साठविला जातो, तसेच एकाच घटकावरील अनेक चाचण्यांचे निकाल एकत्र करून एकत्रित निकालात त्यांची बेरीज केली जाते. प्रतिप्रश्न वेळेचे आलेख तसेच प्रतिशत वेळेचे आलेख विद्यार्थ्याची प्रगती सातत्याने दाखवितात.
 

गणित व बु. चाचणी या विषयांच्या प्रश्नांची स्पष्टीकरणे हा या प्रोग्रॅमच्या विकासामधील पुढचा महत्वाचा टप्पा होता. या स्पष्टीकरणांमुळे चुकलेल्या प्रश्नांशेजारीच स्पष्टीकरण विद्यार्थ्याला पहायला मिळते. त्यामुळे कच्चे दुवे लक्षात येउन त्यांच्यावर त्वरीत उपाययोजनाही होते.

संगणकीय परीक्षणाचा एक महत्वाचा फायदा म्हणजे विद्यार्थ्यांचे कच्चे दुवे शिक्षकाला/पालकाला त्वरीत समजतात व त्यावर उपाययोजना केल्यांनतर झालेली सुधारणाही त्वरीत तपासता येते.

सरावसत्रे ही प्रोग्रॅममधील पुढची सुधारणा होती. ड्रिल ऍ़ण्ड प्रॅक्टीस प्रकारची ही ऍ़क्टीव्हिटी आहे. एखादी क्रिया अचूक करण्यासाठी त्यातील पाय-या अचूक करण्याची गरज असते, आणि, यासाठी सातत्यपूर्ण सराव खूप उपयोगाचा असतो. सरावसत्रांतून हा सातत्यपूर्ण सराव करुन घेतला जातो. अगदी सोपे उदाहरण द्यायचे झाले तर संख्यावाचनाच्या सरावसत्राचे (इ. ४ थी) देता येईल.

या सरावसत्रामध्ये १ पासून १ कोटीपर्यंतची कोणतीही एक संख्या रॅण्डम जनरेशनने निवडली जाते. या संख्येचे नाव (उदा. चौसष्ट लक्ष त्र्याण्णव हजार दोनशे) तयार करण्यासाठी प्रोग्रॅम लिहिलेला आहे. ही संख्या विद्यार्थ्याकडून लिहून घेतली जाते, व चुकल्यास स्थानिक किंमतींचा तक्ता दाखवून संख्यावाचन समजावून दिले जाते.

इयत्ता ७ वीच्या गणितातील सरावसत्रे अधिक गुंतागुंतीचे प्रोग्रॅम असणारी आहेत. उदा. सरळव्याजावरील गणितांमध्ये I = (PNR)/100  व A = P + I या दोन सूत्रांचा वापर करून रॅण्डम जनरेशनने प्रश्न तयार केले गेले आहेत.

अशा प्रकारे प्रोग्रॅमद्वारे अगणित प्रश्नांची निर्मिती हे सरावसत्रांचे प्रमुख वैशिष्ट्य आहे.

भाषा (मराठी व इंग्रजी) विषयांच्या सरावसत्रांमध्ये भाषिक कौशल्ये (समानार्थी, विरुध्दार्थी, म्हणी, वाक्प्रचार इ.) तपासणा-या प्रश्नांसाठी देखील सरावसत्रांचा वापर चांगला होउ शकतो. यात ड्रॅगड्रॉप सारख्या क्रियेने जोड्या जुळविल्यामुळे विद्यार्थ्यांना शब्द लक्षात ठेवणे सोपे जाते.

वर्ष २०१० पासून या संचात दृकश्राव्य स्रोतांची भर पडण्यास सुरुवात झाली. घटकांचे स्पष्टीकरण तसेच प्रश्नांची सोडवणूक अशा दोन्ही प्रकारचे व्हिडिओज बनविले जातात. या स्रोतांमुळे डिव्हिडी संच ख-या अर्थाने "स्वयंपूर्ण अभ्याससाधन" बनण्यास सुरुवात झाली आहे.

शिष्यवृत्ती परीक्षेतील काही प्रश्न अतिशय अवघड असतात. विद्यार्थीच नव्हे तर शिक्षक पालकांनाही ते आव्हानात्मक वाटू शकतात. अशा प्रश्नांसाठी तज्ज्ञांचं (सध्या नि:शुल्क) मार्गदर्शन उपलब्ध करुन देत आहोत. ही सेवा इ. ४ थी व ७ वी शिष्यवृत्ती परीक्षांच्या मराठी, इंग्रजी, सेमी इंग्रजी या तीन ही माध्यमांसाठी आहे. गतवर्षी अनेक पालक, विद्यार्थी व शिक्षकांनी या सेवेचा लाभ घेतला.
परीक्षेतील न सुटणारे प्रश्न सोडविणारे व्यासपीठ - प्रश्नवेध

महाएज्युटेकनेट संकेतस्थळावर इतिहास, भूगोल व सा. विज्ञानाचे माईंडमॅप्स देताना आम्ही म्हटले होते की हे माईंड मॅप्स म्हणजे ‍शिष्यवृत्ती परीक्षेतील ६० गुणांची हमी आहेत. लिहिताना अतिशय आनंद आहे की आमचे म्हणणे १०० टक्के खरे ठरले. विशेषत: इतिहास, भूगोलातील प्रश्न माईंड मॅप्स वापरणा-या विद्यार्थ्यांना अतिशय सोपे गेले कारण, सर्व प्रश्नांची उत्तरे माईंडमॅप्समध्ये योग्य रितीने मांडली होती.
(माईंड मॅप्स व २०१३ च्या प्रश्नपत्रिका - विश्लेषण)

अशा रितीने हा डिव्हिडी संच स्कॉलरशिप परीक्षांच्या तयारीसाठी अतिशय उपयुक्त आहे. रुढ अर्थाने व्यापारी उद्दीष्टे मनात ठेउन हा संच बनविला गेलेला नाही. विद्यार्थी, पालक आणि महाएज्युटेकनेट टीम यांनी विद्यार्थ्याची प्रगती हे एकच उद्दीष्ट डोळ्यासमोर ठेउन हा प्रकल्प  राबवायचा आहे असे आम्ही समजतो. यासाठी प्रोग्रॅम व कंटेंटमध्ये सातत्याने सुधारणा व भर घालण्याचे काम चालू असते. यातील अनेक गोष्टी संकेतस्थळावरही उपलब्ध करून दिल्या जातात. पालकांनीही या संचासाठी पैसे भरताना आपण हा संच "विकत घेतो आहोत" अशी भावना न ठेवता आपण या प्रकल्पात "सहभागी होत आहोत" अशी भावना ठेवावी अशी आमची नम्र अपेक्षा आहे.

- महाएज्युटेकनेट टीम

The program (with all described features) is available separately for Marathi/English/Semi English medium.