सराव संच ४.२ (पृ. ३४६)

३) प्रश्नाचे उत्तर १७६० सेमी येते. मात्र उत्तर मीटरमध्ये विचारले आहे, म्हणून ते १.७६ मी. असे हवे. हे उत्तर पर्यायात नाही.

१२) प्रश्नाचे उत्तर १२० मी. असे येते. पर्यायात सर्व उत्तरे रु. या एककात दिली आहेत.

१३) प्रश्नात गणिती चुक काहीच नाही, मात्र बसच्या चाकाचा व्यास २.८ मी (९ फुटांहून अधिक) अवास्तव वाटतो.

१४) चौरसाची परिमिती २२४ सेमी येते. हे उत्तर पर्यायात नाही.

सराव संच ४.३ (पृ. ३५९)

५) प्रश्नाचे उत्तर ७७० चौमी येते, ते पर्यायात नाही.

९) प्रश्नाचे उत्तर ११२ चौसेमी येते, ते पर्यायात नाही.

सराव संच ४.४ (पृ. ३६८)

८) उत्तर १९६१.१४ चौमी येते, पर्यायात ते १९५९.३६ दिले आहे. ते पायची किंमत ३.१४ घेउन काढले आहे. इतरत्र पायची किंमत २२/७ घेतली आहे. पायची वेगळी किंमत अपेक्षित असेल तर त्याचा उल्लेख करायला पाहिजे.