सराव संच ३.१ (पृ. २७८)

३) भिन्न प्रतलातील दोन वेगवेगळ्या बिंदूतून केवळ एकच रेषा जाउ शकते. उत्तरात असंख्य रेषा असे दिलेले आहे. ते चुकीचे आहे.

१९) "तास काटा १२ वर व मिनिट काटा ६ वर" ही अवस्था अशक्य आहे, तास काटा १२ व १ च्या मध्ये असे प्रश्नात दिले पाहिजे होते. त्या वेळी म्हणजे १२.३० वाजता दोन्ही काट्यांमध्ये १८० - १५ = १६५ अंशाचा कोन होईल.

२४) १२ वाजल्यापासून १ वाजेपर्यंत म्हणजे १ तासात मिनिटकाटा ३६० अंशांतून फिरेल, उत्तर ३३० अंशांतून असे दिले आहे.

 

सराव संच ३.३ (पृ. २९८)

१०) वर्तुळाचा परीघ व व्यास यांचे गुणोत्तर ३.१४ : १ असे असते, उत्तरात ते ३ : १४ असे चुकीचे दिले आहे.

सरावसत्रात अनेकदा लांबीचा उल्लेख करताना एकक दिलेले नाही, हे चुकीचे आहे. लांबी १० आहे याला काही अर्थ नाही. किमान लांबी १० एकक आहे असे म्हणायला हवे. १६ व्या प्रश्नात लांबी सेमी मध्ये दिली आहे, मात्र उत्तरांच्या पर्यायात क्षेत्रफळाला कोणतेही एकक दिलेले नाही.

 

सराव संच ३.४ (पृ. ३०९)

८) R शिरोबिंदू असणारे त्रिकोण आहेत. (आकृती पहा). उत्तर असे दिले आहे.

 

सराव संच ३.५ (पृ. ३२०)

१२) x ची किंमत ८ असेल तर 2x + 1 काढण्यासाठी पायथॅगोरस प्रमेय कशाला हवे? सरळ १७ उत्तर काढता येते. म्हणून हा प्रश्न अस्थायी आहे.

 

सराव संच ३.६ (पृ. ३२७)

६) लगतच्या बाजू एकरुप असणारा चौकोन पतंग असतो, उत्तरांमध्ये हा पर्यायच नाही. उत्तर चौरस असे दिले आहे. ते चुकीचे आहे.