ही साईट 1024 गुणीले 768 किंवा त्याहून अधिक रिझॉल्युशनमध्ये सर्वोत्तमप्रकारे पाहता येईल

 

पारनेर पब्लीक स्कूलचे शिष्यवृत्ती परीक्षेतील सुयश

 

परत पहिल्या पानाकडे


 


श्री. गीताराम म्हस्के यांनी २००१ या वर्षी पारनेर तालुक्यातील पहिली इंग्रजी माध्यमाची शाळा येथे सुरु केली. शाळेचे संस्थापक ही ते आहेत, आणि मुख्याध्यापकही. आणि हिच गोष्ट त्यांचे वेगळेपण दाखवून देते. त्यांचे गुरु श्री. डांगे सर यांच्या विचारांवर आधारित शैक्षणिक प्रयोग त्यांनी केला आहे. शासनाचे एक पैसा अनुदान न घेता, कोणत्याही राजकिय पाठिंब्याशिवाय (आणि हस्तक्षेपाशिवाय) गेली १२ वर्षे ही शाळा सुरु आहे. अतिशय माफक फी घेतली जाते, वर्गात ३५ विद्यार्थ्यांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांना प्रवेश नसतो, शिक्षक उच्चशिक्षित आहेत. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे म्हस्के सर पूर्णवेळ शाळेत असतात.

सरांना शिक्षणाच्या प्रत्येक गोष्टीत रस आहे, संगणक, इंटरनेट ही आधुनिक तंत्रज्ञाने त्यांना अवगत आहेत. मुलांच्या सर्वांगिण विकासासाठी ज्या ज्या गोष्टी करायला पाहिजेत त्या सर्व करण्यात ते कणमात्र कसूर करीत नाहीत.

म्हस्के सरांनी "महाएज्युटेकनेट शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ४/७) साठी मार्गदर्शक प्रणाली" त्यांच्या शाळेमध्ये इन्स्टॉल करुन घेतली होती. या प्रणालीचा पुरक शैक्षणिक साधन म्हणून प्रभावी वापर शिक्षकांनी केला. त्यांच्या शाळेच्या ९ मुलांना शिष्यवृत्ती मिळाली. हे यश शिक्षकांचे, विद्यार्थ्यांचे व त्यांच्या पालकांचे आहे. त्यात महाएज्युटेकनेट प्रणालीचा अंशत: हातभार असल्याचा आम्हाला आनंद आहे. म्हस्के सर, त्यांचे शिक्षक व विद्यार्थी यांचे महाएज्युटेकनेट टीमतर्फे हार्दिक अभिनंदन!

यशस्वी विद्यार्थ्यांची नावे :

HSS
1) Sanket Ukhaji khaire 230 Marks
2) Aditya Bhaskar Lande 226 Marks
3) Abhishek Gitaram Mhaske 220 Marks.
4) Prasad Kailas Sonawale 214 Marks

MSS
1) Lavanya Sunil Thorat 268 Marks
2) Samarth Dilip Thube 266 Marks
3) Yash Sopan Waphare 250 Marks
4) Aditya Cintamani Mandge 248 Marks
5) Ajinkya Jayprakesh Sathe 246 Marks

- महाएज्युटेकनेट टीम


 

संपर्क cyberedutech@gmail.com